जळगाव ( प्रतिनिधी ) — जामनेर तालुक्यातील पूर आणि अतिवृष्टीच्या परिस्थितीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत लक्ष ठेऊन आहेत
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की , वाघूर नदीचे उगमस्थान असलेल्या भागातही भरपूर पाऊस झाला आहे जामनेर तालुक्यासह अन्य भागात आता पावसाचा जोर कमी झालेला असला तरी आजच्या पेक्षाही भयंकर परिस्थिती उद्भवल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन जिल्हा प्रशासन करीत आहे जामनेर ते भुसावळ मार्गावर एक पूल पाण्याखाली गेला होता त्या भागासह असे पूल पाण्याखाली जाऊ शकणाऱ्या भागात स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत पोलीस निरीक्षक , महसूल अधिकारी , आरोग्य अधिकारी यांना जास्त त्रास होऊ शकणाऱ्या भागात जाऊन उपाय योजना सुरु करण्यास सांगण्यात आले आहे मदतीचे काम सुरु करण्यासाठी आजच तयारी करण्यात आली आहे नागरीकांनी घाबरून जाऊन अफवांना बळी पडू नये प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचा अमल तात्काळ प्रतिसाद देऊन करावा आवश्यक त्या उपायांच्या कामांना उद्यापासून वेग देण्यात येईल या भागाची पाहणी उद्या आमदार गिरीश महाजन करणार आहेत
या पावसात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कोरडवाहू शेतकरी पूर्ण हतबल झाले आहेत केळी , कापूस , सोयाबीन आदी पिकांच्या हानीने हा हंगाम तालुक्यात वाया गेला आहे अक्षरशः शेतकरी रडताना आज दिसत होते