जळगाव (विशेष प्रतिनिधी) – येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण यांची बदली झाल्याची माहिती मिळत असून त्यांच्या जागी धरणगाव येथील वैद्यकीय अधीक्षक किरण पाटील यांची पदोन्नती होऊन जिल्हा शल्यचिकित्सकपदी वर्णी लागणार असण्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

याबाबत डॉ. एन. एस. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी बदलीस पात्र आहे. माझी बदली होणार असल्याची माहिती आहे. मात्र मला अद्याप कुठलेही आदेश प्राप्त झालेले नाही. बदलीबाबत अधिकृत सांगू शकत नाही. गेली चार वर्षे झाले, जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून मी जिल्ह्यात काम पाहत आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप माझ्यापर्यंत कुठलेही आदेश आले नसून मला काहीही माहित नसल्याचे सांगितले.दरम्यान रविवार व सोमवार सुट्टीचे दिवस असल्याने बदलीबाबत आदेश मंगळवारी निघतील अशी माहिती मिळाली सुत्रांकडून मिळाली आहे.







