सीईओंच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही पूर्ण
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषदेंतर्गत विविध आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया मंगळवार दि १३ मे पासून सुरू झाली असून बदल्यांच्या दुसऱ्या दिवशी दि.१४ रोजी आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या ९ संवर्गाच्या कर्मचारी अधिकारी यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. तर ग्रामपंचायत विभागांतर्गत २ संवर्गाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात आल्या.
यात आरोग्य विभागातील १९ कर्मचारी यांच्या प्रशासकीय तर ३१ कर्मचारी यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या.६ कर्मचारी यांच्या आपसी बदल्या करण्यात आल्या. ग्रामपंचायत विभागांतर्गत २०कर्मचारी यांच्या प्रशासकीय तर ४० कर्मचारी यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या.संपूर्ण बदली प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशन प्रक्रियेद्वारे इन कॅमेरा पारदर्शक पद्धतीने करण्यात आली.
या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर आदी यावेळी उपस्थित होते.
आरोग्य विभागांतर्गत प्रयोग शाळा तंत्रज्ञ,औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका,आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यिका, आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य पर्यवेक्षका या संवर्गाच्या प्रशासकीय व विनंती बदल्या समुपदेशन पद्धतीने करण्यात आल्या. ग्रामपंचायत विभागांतर्गत ग्राम विस्तार अधिकारी व ग्राम विकास अधिकारी या संवर्गाच्या प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या.