जिल्हा परिषदेचे जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
शिक्षक दिनी उद्या वितरण
जळगाव (प्रतिनिधी) – ग्राम विकास विभागातर्फे सन २०२३-२४ या वर्षासाठी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हयातील सर्व तालुक्यातून एकुण २३ प्रस्तावांपैकी एकुण १५ शिक्षकांच्या प्रस्तावास विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांची मान्यता प्राप्त झाली आहे. जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे जिल्हा परिषदेचे सीईओ श्री अंकित यांनी पत्राद्वारे जाहीर केले आहेत.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये अमळनेर तालुक्यातून ढेकुसिम येथील गजानन रमण चौधरी, भडगांव तालुक्यातील जि.प.शाळा अंचळगावचे गणेश व्यंकटराव पाटील, बोदवड तालुक्यातील जि.प.शाळा नाडगाव येथील महेद्रसिंग शिवसिंग पाटील. भुसावळ तालुक्यातून जि.प. उर्दु शाळा कु-हे उर्दु येथील उपशिक्षक रिजवानखान अजमलखान, चोपडा तालुक्यातून जि.प.शाळा देवगावचे किशोर बाळाराम पाटील, चाळीसगाव तालुक्यातील जि.प.शाळा न्हावे येथील शुभांगी एकनाथराव सोनवणे, धरणगांव तालुक्यातील जि.प.शाळा वराड बु येथील डॉ. विजय काशीनाथ बागुल, एरंडोल तालुक्यातील जि.प.शाळा टाकरखेडा येथील गणेश सुखदेव महाजन, जळगांव तालुक्यातील जि.प.शाळा नांद्रे बु येथील ज्योती सतीष तड़के, जामनेर तालुक्यातील जि.प.शाळा सोनारी येथील कैलास समाधान पाटील, मुक्ताईनगर तालुक्यातील केंद्रीय शाळाचे धनलाल वसंत भोई, पाचोरा तालुक्यातील बाळंद येथील विजया भालचंद्र पाटील, पारोळा तालुक्यातील जि.प. शाळा बोळे येथील अलका बाबुलाल चौधरी, रावेर तालुक्यातील जि.प. शाळा पुनखेडा येथील जितेंद्र रमेश गवळी, यावल तालुक्यातील जि.प.मराठी मुलांची शाळा सांगवी बु येथील अतुल रमेश चौधरी यांचा समावेश आहे.
सदर शिक्षकांना पुरस्कार वितरण सोहळा दि. ५ सप्टेंबर रोजी भाऊसाहेब गंधे सभागृह, ला. ना. विद्यालय, जळगांव येथे सकाळी ११ वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे. शिक्षकांनी सहपरिवार उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.