• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा परिषद शिक्षकांनी ड्रेस कोडचा वापर करण्याची गरज : मंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, pagbet brazil, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्हा परिषद शिक्षकांनी ड्रेस कोडचा वापर करण्याची गरज : मंत्री गुलाबराव पाटील

जळगावात ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय प्रदर्शन हे सुरुवात मानून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवून आपल्या पालकांचे, शाळेचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे. जिल्हा परिषद शिक्षकांनी ड्रेस कोड चा वापर करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शहरातील सेंट टेरेसा विद्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आज मोठ्या थाटात करण्यात आले. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून उद्घाटन पार पडले.

मान्यवरांनी सर्वप्रथम श्री सरस्वती पूजन दीपप्रज्वलन करून व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले, तर विविध शालेय खेळ व प्रयोगात्मक प्रात्यक्षिके सादर करत विद्यार्थ्यांनी विज्ञानाची गोडी उपस्थितांना चाखवली. विद्यार्थ्यांच्या या सर्जनशीलतेला उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नवनवीन शोध, प्रयोग व तंत्रज्ञानावर आधारित सादरीकरणे केली आहेत. या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या वैज्ञानिक विचारसरणीला धार देण्याचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागली असून, भविष्यात विज्ञान क्षेत्रात अधिक आवडीचे काम करायला प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली. हा कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांसाठी एक अद्वितीय अनुभव ठरला असून यामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात अधिकाधिक गती मिळवण्याची अपेक्षा आहे.

यावेळी डायटचे प्राचार्य अनिल झोपे, जिल्हा परिषद जळगावचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) ई. आर. शेख, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रागिणी चव्हाण, गट विकास अधिकारी सरला पाटील, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) एन एफ चौधरी, ज्ञानेश्वर सोनवणे, गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी डी धाडी, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ किशोर राजे, विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे, उपाध्यक्ष एस डी पाटील, सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम हायर सेकंडरी स्कुलच्या मुख्याध्यापिका सिस्टर जुलीट, शालेय व्यवस्थापन समिती व कर्मचारी, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विद्यालयातील मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव आदींचे या समारंभाला उपस्थित होते.

शिक्षकांचे साहित्य प्रदर्शन : शिक्षकांचे शैक्षणिक मॉडेल प्राथमिक १५, माध्यमिक १५, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य मॉडेल – माध्यमिक – ४५ प्राथमिक ४५, शैक्षणिक साहित्य मॉडेल प्रयोगशाळा सहाय्यक – १५. शैक्षणिक साहित्य मॉडेल दिव्यांग विद्यार्थी – २. शैक्षणिक साहित्य मॉडेल आदिवासी गट – ६. विज्ञान प्रदर्शन हा केवळ स्पर्धा नाही, तर तो आपल्या प्रयोगशीलतेला नवे आयाम देणारा एक मंच आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेस चालना देण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रयोगशील विचारसरणी अंगी कारावी, जे जमते त्यावर अधिक भर द्यावा. विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपल्या कल्पनांना कृतीत उतरवून विज्ञान प्रदर्शनातून यशाचा मंत्र आत्मसात करावा असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सेंट टेरेसा विद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. रोबोटव्दारे आलेल्या कात्रीने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ५२ वे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.


 

 

Tags: #gulabrav patil #jalgaon #mumbai #mharashtra bharat
Previous Post

जबरी घरफोडी करून चोरटयांनी लांबविला ९ लाखांचा मुद्देमाल

Next Post

बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला विहिरीत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला विहिरीत

बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला विहिरीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon