जळगाव ( प्रतिनिधी ) – ॲड. सीताराम बाहेती यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने आणि जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहकार्याने जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि.१ ते ३ ऑगस्ट २०२५ दरम्यान कान्ताई सभागृह (जुना नटराज थिएटर), जळगाव येथे संपन्न होणार आहे.
या स्पर्धेसाठी एकूण ₹१५,०००/- ची रोख पारितोषिके ठेवण्यात आलेली असून, ती ॲड. रोहन बाहेती यांच्या सौजन्याने दिली जाणार आहेत. स्पर्धेचे प्रमुख संयोजक मंजूर खान (मो. ९९७०६४७८६८) व तांत्रिक प्रमुख सय्यद मोहसिन (मो. ७०२०६ ७३३५७) यांच्याशी स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून कय्यूम खान व शेखर नरवरिया कार्यरत राहणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व कॅरमपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा व आपल्या कौशल्याची चमक दाखवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.