जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेसाठी भाजपच्या बैठकीतही ‘ स्वबळाची ‘ खलबते सुरु झाली आहेत . जिल्ह्यातील नेत्यांची तातडीची बैठक आज बोलावली गेली आहे प्रदीर्घ वेळ चाललेल्या चर्चेने उत्सुकता ताणली गेली आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या चाचपणीसाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू असून भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा शासकीय विश्रामगृहात बैठक सुरु आहे या बैठकीला भाजपचे खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित आहेत.
काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसने भाजपसोबत निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिल्याने भाजपने आता स्वबळाची तयारी केली असून, सर्व 21 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या बैठकीत उमेदवारी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा बँकेतही विरोधकांना धक्कातंत्र देण्याचा भाजपचा इरादा आहे असे म्हटले जात आहे.