जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत २१ जागांसाठी १४९ उमेदवार मैदानात उतरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल केलेल्या २७९ उमेदवारांपैकी १३० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.
या निवडणुकीत अनुसूचित जाती – जमाती मतदारसंघातून १६ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ६ अर्ज अवैध ठरवण्यात आले. १० उमेदवार आता मैदानात आहेत. इतर मागासवर्गीयांसाठी राखीव मतदारसंघातून ४० अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी १४ अर्ज अवैध ठरवण्यात आले. २६ उमेदवार आता मैदानात आहेत. महिलांसाठी राखीव मतदारसंघातून ४० अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी १४ अर्ज अवैध ठरवण्यात आले. २६ उमेदवार आता मैदानात आहेत. विमुक्त जाती – भटक्या जमातींसाठी राखीव महिलांसाठी राखीव मतदारसंघातून ४० अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी १४ अर्ज अवैध ठरवण्यात आले २६ उमेदवार आता मैदानात आहेत. इतर संस्था मतदारसंघातून ५० अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी २३ अर्ज अवैध ठरवण्यात आले. २७ उमेदवार आता मैदानात आहेत.
अमळनेर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ७ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ६ अर्ज अवैध ठरवण्यात आले. १ उमेदवार आता मैदानात आहे. चाळीसगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ९ अर्ज दाखल झाले होते त्यापैकी ३ अर्ज अवैध ठरवण्यात आले. ६ उमेदवार आता मैदानात आहेत. चोपडा विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून १५ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ७ अर्ज अवैध ठरवण्यात आले. ८ उमेदवार आता मैदानात आहेत .धरणगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ४ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी २ अर्ज अवैध ठरवण्यात आले २ उमेदवार आता मैदानात आहेत .मुक्ताईनगर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ७ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ५ अर्ज अवैध ठरवण्यात आले. २ उमेदवार आता मैदानात आहेत . एरंडोल विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ४ अर्ज दाखल झाले होते त्यापैकी ३ अर्ज अवैध ठरवण्यात आले १ उमेदवार आता मैदानात आहे जळगाव . विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ११ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ५ अर्ज अवैध ठरवण्यात आले. ६ उमेदवार आता मैदानात आहेत जामनेर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ६ अर्ज दाखल झाले होते त्यापैकी ३ अर्ज अवैध ठरवण्यात आले. ३ उमेदवार आता मैदानात आहेत. पाचोरा . विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ७ अर्ज दाखल झाले होते,त्यापैकी ४ अर्ज अवैध ठरवण्यात आले. ३ उमेदवार आता मैदानात आहेत. पारोळा विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ४ अर्ज दाखल झाले होते,त्यापैकी ३ अर्ज अवैध ठरवण्यात आले. १ उमेदवार आता मैदानात आहेत बोदवड विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ६ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ४ अर्ज अवैध ठरवण्यात आले २ उमेदवार आता मैदानात आहेत. भडगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ९ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ३ अर्ज अवैध ठरवण्यात आले. ६ उमेदवार आता मैदानात आहेत भुसावळ विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ८ अर्ज दाखल झाले होते त्यापैकी ४ अर्ज अवैध ठरवण्यात आले ४ उमेदवार आता मैदानात आहेत यावल विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ७ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ३ अर्ज अवैध ठरवण्यात आले ४ उमेदवार आता मैदानात आहेत रावेर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ८ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी १ अर्ज अवैध ठरवण्यात आले. ७ उमेदवार आता मैदानात आहेत.