जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्या गेलेल्या ९ उमेदवारांच्या अपिलावर आज नाशिक येथे विभागीय सहनिबंधकांच्या ( सहकार ) दालनात सुनावणी पूर्ण झाली . या सुनावणीचा निर्णय उद्या विभागीय सहनिबंधकांकडून जाहीर केला जाणार असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा उत्सुकता वाढली आहे.
माधुरी अत्तरदे , माजी आमदार संतोष चौधरी , माजी आमदार स्मिता वाघ , भारती चौधरी , नाना पाटील , दिलीप पाटील यांच्यासह ९ उमेदवारांच्या अपिलावर आज विभागीय सहनिबंधक श्रीमती लाटकर यांच्या दालनात सुनावणी पूर्ण झाली . त्यांनी अंतिम निकाल आज राखून ठेवला आहे . उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे . या सुनावणीत नाना पाटील यांची बाजू लक्षवेधी पद्धतीने मांडली गेली नाना पाटील यांची बाजू अँड सरदारसिंग परदेशी , ठोके पाटील असोसिएट्सचे अँड नागरगोजे यांनी युक्तिवादातून प्रभावीपणे मांडली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची बाजू अँड विक्रम पवार यांनी मांडली . जिल्हा सहकारी बँकेची बाजू अँड धनंजय खेवलकर यांनी मांडली .