जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लढवली जाणार ? , या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणारी सर्वपक्षिय बैठक शहरातील अजिंठा विश्राम गृहात सुरु झाली आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी भाजपला थेट विरोधाची भूमिका जाहीर केल्याच्या पार्शवभूमीवर या बैठकीत आमदार गिरीश महाजन आता काय बोलतात याबद्दल सगळ्यांची उत्सुकता वाढली आहे.
अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात चारही पक्षांची बैठक सुरू आहे आमदार गिरीश महाजन यांच्यासह शिवसेनेकडून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. कीशोर पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतिष पाटील , काँग्रेसकडून आ. शिरीष चौधरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार डी जी पाटील या बैठकीत सहभागी झाले आहेत .
सत्तेसाठी तत्वाशी तडजोड करणार नाही असे सांगत पत्रपरिषद घेऊन प्रदीप पवार यांनी जिल्हा बँकेत भाजपसोबत बसणे मान्य नाही . म्हणून आम्ही जिल्हा बँकेसाठीच्या सर्वपक्षीय पॅनलमधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले होते . जागावाटप जाहीर होऊनही त्यांनी अशी भूमिका घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती .
आजच्या बैठकीत काँग्रेसच्या जागा वाढवल्या जातात का ? काँग्रेसच्या जागा वाढवल्या तर बाकीच्या पक्षांच्या नेमक्या कोणत्या आणि कशा जागा कमी होतील याचीही उत्सुकता वाढवली गेली आहे नेमक्या कोणत्या मुद्द्यावर प्रदीप पाटील तडजोड करतात ? किंवा त्यांची भूमिका खोडून काढताना आमदार गिरीश महाजन कसा राजकीय मुत्सद्दीपणा दाखवतात ?, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे .