जळगाव (प्रतिनिधी ) ;- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीने चौकशी केली असतांना त्यांच्या कन्या रोहिणीताई खडसे या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष असून बँकेला ईडीची नोटीस प्राप्त झाल्याच्या चर्चेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील एका खासगी साखर कारखान्याला कर्जपुरवठासह बँकेतील इतर आर्थिक व्यवहारासंबंधात सक्त वसूली संचालनालय अर्थात ईडी विभागाने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान जिल्हा बँकेला ही नोटीस प्राप्त झाल्याच्या माहितीने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही .