जळगाव ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार अरुण पाटील हे अचानक आज जी एम फाउंडेशनच्या जळगावातील कार्यालयात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत . ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असली तरी लगेच याबद्दल अधिकृत दुजोरा मिळालेला नाही .
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. माजी आमदार अरुण पाटील यांनी रावेर तालुका सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे रावेर तालुका सोसायटी मतदारसंघात जिल्हा बँकेचे ५४ मतदार आहेत . माजी आमदार अरुण पाटील यांच्या विरोधात भाजपकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असला तरी माजी आमदार अरुण पाटील यांच्यासाठी महाजन माघार घेतील आणि माजी आमदार अरुण पाटील हे निवडणुकीत राहातील कीवा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार अरुण पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील ? जिल्हा बँक निवडणुकीत भाजपची साथ माजी आमदार अरुण पाटील यांना मिळेल , अशी चर्चा सुरु आहे . या मुद्यावरच सध्या माजी पालकमंत्री व आमदार गिरीश महाजन आणि माजी आमदार अरुण पाटील यांची चर्चा सुरु आहे .