जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्या गेलेल्या ९ उमेदवारांच्या अपिलावर आता २९ तारखेला ( शुक्रवार ) विभागीय सहनिबंधक निकाल देणार आहेत.
नाशिक येथे विभागीय सहनिबंधकांच्या ( सहकार ) दालनात ही सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली होती . या सुनावणीचा निर्णय विभागीय सहनिबंधकांकडून शुक्रवारी जाहीर केला जाणार असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा उत्सुकता वाढली आहे.
विभागीय सहनिबंधक जो निकाल शुक्रवारी देतील तो मान्य नसेल असे उमेदवार त्यांच्या निकालाला हायकोर्टात आव्हान देऊ शकतात.
माधुरी अत्तरदे , माजी आमदार संतोष चौधरी , माजी आमदार स्मिता वाघ , भारती चौधरी , नाना पाटील , दिलीप पाटील यांच्यासह ९ उमेदवारांच्या अपिलावर विभागीय सहनिबंधक श्रीमती लाटकर यांच्या दालनात सुनावणी झाली . त्यांनी अंतिम निकाल राखून ठेवला आहे .
जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणार्या या घडामोडी माघारीच्या तारखे पर्यंत
कशी वळणे घेऊ शकतात याचे आडाखे बांधत सगळेच पक्ष व प्रबळ समजले जाणारे उमेदवार आता परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत .