शिक्षिका मीनाक्षी सोनार यांचा प्रशिक्षणार्थी कालावधी समाप्त
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंभोरा बु. येथिल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे व जि.प.शाळा शिक्षकांचे कार्य उत्कृष्ट आहे असे प्रतिपादन राजू बोरसे यांनी केले. निंभोरा स्टेशन ता. रावेर येथील जि.प. मराठी शाळेत येथील प्रशिक्षणार्थी शिक्षिका मीनाक्षी विजयकुमार सोनार यांनी गेल्या सहा महिन्यापासून यशस्वी शैक्षणिक कार्य करत असल्याने व त्यांचा सेवा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना शालेय शिक्षण समिती व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देत निरोप दिला.
यावेळी शिक्षिका सोनार यांनी शालेय विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र उजळणी व पेन मान्यवरांच्या हस्ते भेट दिली. या कार्यक्रमात राजीव बोरसे, दस्तगीर खाटीक, विजय सोनार, मीनाक्षी सोनार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष वसीम शेख, उपाध्यक्ष गौतम कुऱ्हे, सभासद दिलीप खैरे, ग्रामपंचायत सदस्य शाहीन बी खाटीक, प्रभाकर सावळे, सुरेश पाटील, विनोद राठोड, तुळशीराम पाटील, मुख्याध्यापक विकास जनबंधू, शिक्षक सोमनाथ उघडे, रेखा महाले, संगीता बिऱ्हाडे, रमा महाले व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक विकास जनबंधू यांनी केले व आभार सोमनाथ उघडे यांनी मानले.