सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
जळगाव (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने विकसित केलेल्या गवहर्नमेट ई – मार्केटप्लेस पोर्टलची कार्यपध्दती, राज्य शासनास वस्तु व सेवा खरेदी करण्यासाठी स्वीकृत करण्यात शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार जेम पोर्टलचा वापर अधिकाधिक वापर करुन पोर्टलव्दारे वस्तु व सेवांची खरेदी करण्यास शासकीय निमशासकीय विभाग व स्वायत्त संस्था यांना बंधनकारक केलेले आहे.
उद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांचे १४ मार्च २०२३ च्या पत्रान्वये सुधारीत खरेदी धोरणातील तरतुदीचो काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत सूचना निर्गमीत केलेल्या आहेत. तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार शासन निर्णय ७ मार्च, २०२४ अन्वये जीईम पार्टलवर उपलब्ध असणा-या वस्तु व सेवांची खरेदी बंधनकारक करण्यात आलेली आहे. जिल्हयामध्ये जीईम प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेकरीता दिनांक १२ ऑगस्ट रोजी अल्पबचत हॉल जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालय/महामंडळ/स्वायंसंस्था यांनी सदर प्रशिक्षणास उपस्थित रहावे असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.