• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक ! जिल्हा कारागृहात कैद्यावर अनैसर्गिक कृत्य, पट्टीने वार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2023
in क्राईम, जळगाव
0
धक्कादायक ! जिल्हा कारागृहात कैद्यावर अनैसर्गिक कृत्य, पट्टीने वार

जळगाव येथील घटना, चौघा कैद्यांवर गुन्हे दाखल

जळगाव (प्रतिनिधी) –  खूनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात असलेल्या बंदीवर त्याच्या बॅरेकमधील इतर बंदीनी अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची वाच्यता केल्यास तरुणाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच अनैसर्गिक कृत्य करण्यास विरोध केला असता, त्या बंदीवर धारदार पट्टीने वार करुन गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात चार बंदीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा कारागृहातील वर्ग २ मध्ये खूनाच्या गुन्ह्यात असलेला २६ वर्षीय संशयिताला ठेवण्यात आले आहे. त्याच्यासोबत बॅरेक १ व २ मध्ये भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, विक्की शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण या बंद्यांना ठेवले होते. दि. १२ रोजी त्या बंद्याला बाथरुममध्ये घेवून जात त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. तसेच कोणाला काही सांगण्याचा प्रयत्न केला, तर तुला बघुन घेईल जीवे सोडणार नाही अशी धमकी दिली. त्याच दिवशी पहाटे चार वाजेच्या सुमारास तो बंदी झोपलेला असतांना त्याच बॅरेकमधील विक्की शिंदे याने त्याला उठवित अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या बंदीने त्यांना नकार दिला असता, त्यांनी त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील लोखंडी पट्टीने त्या बंदीच्या गळ्यावर वार केले.

गळ्यावर वार झाल्याने जखमी झालेला बंदी जमिनीवर कोसळल्यानंतर बंद्यांनी दिलेल्या धमकीला घाबरुन तो गळ्याला कापड बांधून झोपून गेला. या घटनेबाबत कारागृहातील बंदीने त्या जखमी बंदीची विचारपुस केली. त्याने घडलेल्या प्रकाराबाबत त्याला सांगितला. हा प्रकार कारागृह प्रशासनाला माहिती पडताच त्यांनी बंदीला कारागृहातील इतर बॅरेकमध्ये ठेवले.

दुसऱ्या बॅरेकमध्ये ठेवल्यानंतर देखील अत्याचार करणारे बंदी त्याच्याजवळ येवून त्याला अधूनमधून धमकी देत होते. त्यामुळे वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून त्या बंद्याने घडलेली घटना दि. २० जुलै रोजी कारागृहातील अधिकाऱ्यांसमोर कथन केली. त्यांनी लागलीच बंद्याची वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात रवाना केले. त्याच्यावर उपचार करण्यात आले.

दमदाटी करुन अनैसर्गिक कृत्य करणारा कारागृहातील बंदी भावेश कांतीलाल दंडगव्हाळ याच्यासह त्याचे मित्र लोखंडी पट्टीने वार करुन अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणारे त्याचे मित्र विकी शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.


 

 

Previous Post

६६ प्रकरणे, ४७ संशयितांवर गुन्हे दाखल, पावणे ९ लाखांचा मुद्देमाल जप्त !

Next Post

तरुणीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोलीतील विवाहितेसह खेडी गावातील तरुणी बेपत्ता

तरुणीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon