अमळनेर ;- अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार प्रा जयश्री दाभाडे यांना FSIA ह्या जयपूर राजस्थान येथील संस्थेने The Real Super Woman Award 2021 हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.या संदर्भात प्रा जयश्री दाभाडे यांचे नॉमिनेशन मागविण्यात आले होते. देशभरातील खऱ्या अर्थाने तळा गाळातील घटकांसाठी कार्य करत असलेल्या महिलांचा सन्मान या संस्थे मार्फत केला जातो. प्रा दाभाडे ह्या सातत्याने वंचित दलित,आदिवासी, महिला,बालक यांच्या साठी उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्याच बरोबर पत्रकारिता क्षेत्रात अत्यन्त कमी वेळात आपल्या लेखणीच्या माध्यमातून ठसा उमटवला आहे.अनेक आंदोलने,उपोषण, अर्ज निवेदने या मार्फत समाजातील अति सामान्य माणसाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी प्रशासनाकडून न्याय मिळविला आहे.वेळ प्रसंगी समाजासाठी तुरुंगवास पत्करण्याची देखील त्यांनी तयारी दाखवली आहे. प्रत्यक्ष फिल्ड वर उतरून कार्य करणाऱ्या प्रा दाभाडे यांनी गेल्या 26 वर्षांपासून निस्वार्थीपणे आपले कार्य सुरू ठेवले आहे. मला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान निश्चितच अभिमानास्पद आहे.सतत कार्य सुरू आहे. गेल्या अनेक वर्षात मी माझ्या कार्यात उसंत घेतली नाही. पुरस्कारांनी जबाबदारी वाढते.अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते.अर्थातच काम करत असताना अनेक अडचणी येतात पण पुन्हा अश्या पुरस्कारांमुळे नव्याने उत्साह निर्माण होतो. अमळनेर करांनी मला खूप प्रेम व सहकार्य दिले आहे.त्यामुळे मी कार्य करू शकते असेच सहकार्य असू द्यावे असे त्यांनी सांगितले.