भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवून सैन्य दलात अग्निवीर असलेल्या जवानाने अत्याचार केला. ही घटना मे २०२४ ते २७ जून २०२४ दरम्यान घडली. याप्रकरणी संशयित शुभम शैलेश कोळी (थोरगव्हाण, ता. रावेर याच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या महिलेला शुभम याने लग्न करेल, असे आमिष दाखवत शहरातील दोन लॉजवर नेत अत्याचार केला. लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर मात्र नकार दिला. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पीडितेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली.