पार्थिव उद्या पाचोरा शहरात येणार
पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये कार्यरत असलेला जवान चेतन हजारे यास देशसेवा बजावताना दि.१५ जून रोजी रात्री १० वाजता वीरमरण आल्याची घटना आज दि. १६ जून रोजी सकाळी हाती आले आहे. या घटनेने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पाचोरा शहरातील देशमुख वाडी भागातील २९ वर्षीय चेतन हजारे हा विवाहित तरुण मिझोराम येथील बॉर्डर सेक्युरिटी फोर्स येथे कार्यरत होता. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना दि. १५ जून रोजी रात्री १० वाजता त्यास वीरमरण आले. सुमारे १० वर्ष त्याने देशसेवा बजावली.
त्याचे पश्चात आई, वडील, एक बहीण, जावई, पत्नी दोन मुले असा परिवार आहे. दिनांक १७ जून रोजी सकाळी ६ वाजता त्यांचे पार्थिव पाचोरा शहरातील देशमुख वाडी येथील राहते घरी आणले जाणार आहे. या घटनेने पाचोरा तालुक्यात शोककळा पसरली आहे.