अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पातोंडा येथील न्यू प्लॉट येथील रहिवाशी व भारतीय लष्करातील जावं जवान गणेश भिमराव पाटील (वय ३६) हे जम्मू काश्मीर मधील सांबा येथे सेवेत असतांना त्याचे काल सायंकाळी आकस्मिक निधन झाले. पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्या पातोंडा येथे लष्करी इतमामात होणार आहेत.

जवान गणेश पाटील यांच्या निधनाची वार्ता कळताच कुटूंबांसह पातोंडा परिसरावर शोककळा पसरली आहे. गणेश हे १४ मराठा बटालियनमधे कार्यरत होते. त्याची आतापर्यंत १६ वर्ष ९ महीने सेवा झाली होती ते येत्या डिसेंबर महिन्यात १७ वर्ष सेवा पुर्ण करून निवृत्तीनंतर घरी परतणार होते, तितक्यात त्याच्यावर काळाने घाला घातला.
जवान गणेश पाटील यांचे पार्थिव लष्कराचे सर्व शासकीय सोपस्कार पुर्ण करून विमानाने मुंबई व मुंबईहून रुग्णवाहिकेने युनिटच्या सहकारी जवानांच्या निगराणीत पातोंडा येथे आणले जाणार आहे त्यासाठी आवश्यक होकार त्यांची पत्नी सीमा पाटील यांनी लष्करी अधिकाऱ्यांना कळवला असल्याचे सांगण्यात आले त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शक्यतोवर उद्याच पातोंडा येथे लष्करी इतमामात होणार आहेत. अमळनेरचे तहसीलदार व जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी गणेश पाटील यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत.
गणेश पाटील यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी सीमा, दोन मुली असा परीवार आहे. शहिद गणेश पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पातोंडा गावातील तरुण वर्गाने पुढाकार घेतला आहे.







