भुसावळ (प्रतिनिधी) – येथील दत्तनगर जवळील हुडको कॉलनीतील नवीन गजानन महाराज मंदिरात काल गुरुपौर्णिमेनिमित्त रघुनाथ आप्पा सोनवणे व मालती सोनवणे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गजानन महाराजांच्या विजय पारायाणाला ३० स्त्रीपुरुषांनी सुरुवात केली. यानंतर मधु ढाके व कविता ढाके यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.
गुरुपौर्णिमेनिमित्त मंदीर परिसर वृक्ष लावण्याच्या वेळी निसर्ग पर्यावरणाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी मार्गदर्शन करतांना ज्या प्रमाणे आपण आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीला किंवा एखाद्याला गुरु मानतो आणि त्यांना आपण श्रद्धेने पूजा-अर्चा करून गुरूंच्या सान्निध्यात राहण्याचा विचार करतो. त्याप्रमाणे जर आपण सर्वांनी वृक्षांनाही आपले गुरु मानले, तर वृक्षाचा आदर निर्माण होऊन लोकांच्या मनात श्रध्दा प्रेमभाव वाढीस लागेल आणि वृक्षाचे संवर्धन व संगोपन या निमित्ताने होईल असे प्रतिपादन नाना पाटील यांनी केले. यावेळी राज्य सल्लागार व ज्येष्ठ नागरिक आप्पासाहेब सोनवणे, मालती सोनवणे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
राज्य सल्लागार सुरेंद्र सिंग पाटील यांच्यासोबत मधु ढाके आणि कविता ढाके यांनी वृक्षारोपण करून संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली त्याचप्रमाणे परिसरातील अनेक मंडळी मधुसूदन बेंडाळे, शारदा बेंडाळे, भास्कर तळेले, अलका तळेले, प्रभाकर बोदडे, मंदाकिनी बोदडे, सचिन तळेले, वासंती तळेले, राजेंद्र राणे, कल्पना राणे, प्रल्हाद पाटील, मिलिंद धांडे, सचिन बोदडे, नारायण विसपुते, सुनंदा महाजन, छाया पाटील, कुणाल ढाके या सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपे लावून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.







