जामनेर ( प्रतिनिधी ) – कवी आणि कविता नसती तर जन्म ओसाड आणि रटाळ झाला असता असे प्रतिपादन कवी वा. ना. आंधळे यांनी केले.
जामनेर येथे स्व. दा. शा. पाटील स्मृती भवनात
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त आयोजित कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. त्यांनी जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या प्रशंसनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. प्रारंभी सरस्वती , सावित्रीबाई फुले आणि स्व . दा. शा. पाटील यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दीपक पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक विलास मोरे , औदुंबर साहित्य रसिक मंच, एरंडोलचे अध्यक्ष अँड . मोहन शुक्ला, न्यू इंग्लिश स्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नाना लामखेडे यांनी मनोगत व्यक्त केले.
सेवानिवृत्त प्रा. एस. आर. महाजन, रत्नाकर सुतार , जनार्दन पांढरे, हरी पाटील , प्रभाकर चौधरी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी भुषविले .
या कविसंमेलनात प्रा . विलास मोरे , प्रा . विमल वाणी , मंगला रोकडे , वसंतराव जावळे , सय्यद रशीद, देवीदास पाटील, भीमराव सोनवणे, विश्वनाथ वानखेडे , पं. ना. पाटील , सुखदेव महाजन , एम.आर. पाटील , ज्योतीनाथ चिखले, डॉ.संगीता गावंडे , रमेश धुरंधर , डॉ.प्रशांत पांढरे , रमेश बनकर , विजय सुर्यवंशी , सौ. जयश्री काळवीट , सौ. संध्या भोळे , आर. जी. सुरवाडे , विनोद जाधव, शंकर भामेरे, कल्पना बनकर, रूपाली सोनवणे यांच्यासह जिल्हाभरातून कवी सहभागी झाले होते .
सूत्रसंचालन डॉ. प्रशांत पांढरे यांनी केले. आभार सुखदेव महाजन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव गोरख सूर्यवंशी, सहसचिव जितेंद्र गोरे, खजिनदार सुखदेव महाजन, रत्नाकर सुतार, शंकर भामेरे, विजय सुर्यवंशी यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी सहकार्य केले. उपस्थित कवींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कवींनी याप्रसंगी निसर्ग , पर्यावरण , जलसाक्षरता , शेतकऱ्यांचे दुःख , अंधश्रद्धा निर्मूलन ,कोरोना महामारी, आई, वनवासी आदी हृदयस्पर्शी विषयांवर कविता सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले .