“विद्यमान आमदार आम्हाला नको” विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया
जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर विधानसभा मतदारसंघाचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांना जामनेर तालुक्यात वाढत प्रतिसाद मिळत असून त्यांना सांगवी, दोदलखेडा, चिलगाव, एकुलती आदी गावांमध्ये भरभरून शुभेच्छा मिळाल्या. गेल्या तीस वर्षांपासून जामनेरला आता विकासाची प्रतीक्षा असून “विद्यमान आमदार आम्हाला नको” अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिलीप खोडपे यांच्याकडे नागरिकांनी व्यक्त केल्या.
सांगवी, दोदलखेडा, चिलगाव, एकुलती, दोंदवाडे, गोंदेगाव, मेणगाव, मोराड आदी गावांत दिलीप खोडपे सर यांनी प्रचार केला. कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी नागरिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.
शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष दीपकसिंग राजपूत, विश्वजीत मनोहर पाटील, म्हसासचे माजी सरपंच धनराज पाटील, प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर पोपट पाटील,अशोक तुळशीराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्रावण वायरमन, विकास सोसायटीचे माजी चेअरमन अमृत पाटील, भीमराव पाटील, ग्रा.प. सदस्य कैलास पाटील,अशोक पाटील, संदीप पाटील,लाख तांडा येथील महारू राठोड, भागचंद पोलीस पाटील, रामेश्र्वर तांडा येथील भीमराव पवार,गोकुळ राठोड, बळीराम जाधव आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.