जामनेर (प्रतिनिधी:) – शहरात ४ दिवसांपासून वेतनवाढ आणि पीएफच्या मागणीसाठी सफाई कामगारांनी संप पुकारला आहे या कामगारांशी वाटाघाटी न करता आता त्यांचा कंत्राटदार त्यांना कायमचे कामावर घरी बसविण अशा धमक्या देत आहे.
जामनेर नगरपरिषेदेच्या आरोग्य खात्यातील ठेकेदार पद्धतीने काम करणार्या कामगारांचा संप गेल्या चार दिवसापासून सुरू आहे चाऱ दिवसापासून कचरा , घंटा गाडया, साफसफाई काम बंद आहे सर्व कामगार घरीच आहेत तरीसुदधा कोणतेही तक्रार नागरीकांडून दिसून येत नाही काम बंद असल्यामुळे गल्ली बोळीत घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे
आम्ही पाच दिवसापासून कामावर जात नाही कारण आम्हाला दोनशे रूपये रोज दिला जातो दोनशे रुपयात आत्ताच्या काळात काही होत नाही महागाई वाढली असून आम्हा सर्व कामगारांना चारशे रुपये रोज़ दीला पाहिजे व आमचा पी.एफ. कापला पाहिजे आमच्या मागण्या पूर्ण कराव्या काम बंद असल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे मागण्या लवकर पूर्ण करण्यात याव्या अन्यथा सोमवारी उपोषण करण्यात येईल असा ईशारा कामगारांनी दिला आहे
दरम्यान ठेकेदाराकडून या संपावर गेलेल्या कामगारांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत कामगार कामावर न आल्यास कायमचे त्यांचे काम बंद करू अशी धमकी कंत्राटी कामगारांना हा ठेकेदार देत आहे .