देशभरातून सहभागी झाले विद्यार्थी
जामनेर (प्रतिनिधी) : “आठवणीतली शाळा” हा उपक्रम घेऊन इंदिराबाई ललवाणी विद्यालयातील सन २००० च्या बॅचच्या दहावीचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल २४ वर्षांनी आठवणीतली शाळा तसेच लहानपणीतील क्षण जगण्याचा प्रयत्न केला.
यावेळी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मनोगत व्यक्त केले. सद्यस्थितीत आपण कोणत्या क्षेत्रात तसेच कोणत्या पदावर कार्यरत आहोत याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मुख्याध्यापक के.व्ही महाजन यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव किशोर महाजन उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण, उप मुख्याध्यापक चौरे, जी. जी. पाटील, ए. बी. पाटील आदी शिक्षकवृंद, कर्मचारी यांची उपस्थिती होती. स्नेहसंमेलनसाठी माजी विद्यार्थी नासिक, मुंबई, हैदराबाद, पुणे, संभाजीनगर, खरगोन, गुजरात अशा विविध शहरातून एकत्रित झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी प्रीतेश देशमुख यांनी केले.