जामनेर (प्रतिनिधी) – येथे बाबाजी राघो मंगल कार्यालय येथे आयोजित लसीकरण covishield लसीचे पहिला व दुसरा असे दोन हजार डोस प्राप्त झाले होते, तरी आज सकाळी 8 :00 वा लसीकरणास सुरुवात करण्यात आली. लसीकरण साठी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी जमली होती.

तरी मा.मंत्री गिरिश भाऊ महाजन हे लसीकरण ठिकाणी स्वतः हजर राहून नागरिकांना शिस्तीत लाईन मध्ये बसण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी गिरिश भाऊ महाजन यांच्यासह, जामनेर उप जिल्हा रुग्णालय डॉ.विनय सोनवणे, जामनेर तालुका भाजपा अध्यक्ष चद्रकांत बाविस्कर, न. प. गटनेते डॉ .प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, जितेंद्र पाटील आतिश झाल्टे व सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अनमोल सहकार्य केले तसेच नागरिकांनी देखील लसीकरण ठिकाणी चांगला प्रतिसाद दिला.








