मंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन
जामनेर (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन यांनी संवाद साधला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारताच्या प्रवासाला गती देण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवायचा आहे असे आवाहन उपस्थितांना केले. या वेळी शेकडो कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भाजपा जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे जितेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, नगरसेवक आतिश झाल्टे, शरद पाटील, जे. के. चव्हाण, नवल राजपूत, गोविंद अग्रवाल, शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे, सुभाष पवार, कैलास पालवे, अजय पाटील यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.