गिरीश महाजन, दिलीप खोडपे, विशाल मोरे यांच्यात प्रमुख लढती
जामनेर(प्रतिनिधी):- येथील विधानसभा मतदारसंघात २२ उमेदवार यांचे अर्ज वैध होते. या पैकी १२ उमेदवारांनी आज दि. ४ रोजी माघारीच्या शेवटच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले.आता एकूण १० उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत भाजपचे मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्यातच होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये खोडपे दिलीप बळीराम ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार), गिरीश दत्तात्रय महाजन(भारतीय जनता पार्टी), विशाल हरिभाऊ मोरे (बहुजन समाज पार्टी), अण्णासाहेब रामचंद्र राठोड (हिंदु समाज पार्टी), प्रभाकर पंढरी साळवे (राष्ट्रीय समाज पक्ष), सेवानिवृत्त पोलीस मदन शंकर चव्हाण (भारतीय जन सम्राट पार्टी) तर चार अपक्ष उमेदवार अनिल रंगनाथ पाटील, दिलीप मोतीराम खामकर, राजेन्द्र सुभाष खरे, राहूल रॉय अशोक मुळे असे एकूण १० उमेदवार रिंगणात असून उद्यापासून खरी प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. अपक्ष उमेदवार कोणासाठी डोकंदुखी ठरतात याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.