महावितरणतर्फे नागरिकांचे अभिनंदन
जळगाव (प्रतिनिधी) : महावितरणच्या भुसावळ विभागातील जामनेर तालुक्यातील वीज कर्मचारी यांच्या प्रयत्नातून आणि ग्राहकांच्या सहकार्यातून लहासर, रामपूर, वाडीकिल्ला आणि नागण ही चार गावे महावितरणच्या चालू महिन्याच्या व थकबाकीच्या बिलातून मुक्त झाली आहेत. तेथील वीज कर्मचारी आणि ग्राहकांचे मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी आणि अधीक्षक अभियंता अनिल महाजन यांनी अभिनंदन केले.
मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर लहासर, रामपूर, वाडीकिल्ला आणि नागण या चार गावांच्या वीजबिल वसुलीची जबाबदारी परिमंडल कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे, जळगाव मंडल कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता वैजनाथ नाचण, सुधीर म्हसणे, वित्त व लेखा विभागाचे उपव्यवस्थापक देवेंद्र कासार यांच्याकडे होती. त्यांनी भुसावळचे कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे, जामनेरचे उपकार्यकारी अभियंता विजय करेरा, जनमित्र विनेद पारधी, यामिनी टोंगळे, भुसावळचे सहाय्यक लेखापाल तडवी, सहाय्यक अभियंता शेखरसिंग राजपूत, रविंद्र पाटील यांच्या सहकार्याने तेथील चालू महिन्याच्या वीजबिलासह संपूर्ण थकबाकीची रक्कम वसूल केली. जामनेर उपविभागाचे स्थानिक अधिकारी-कर्मचारी यांचा तायडे, नाचण, म्हसणे व कासर यांनी एका समारंभात सत्कारही केला.