जळगाव ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील विविध पक्षांच्या आणि संघटनांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे , अशी माहित आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ मनोहर पाटील यांनी दिली .
खासदार संजय राऊत , शिवसेनेचे सचिव अनिल देसाई , उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांच्या हस्ते व . रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर , सहसंपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत सोनवणे , जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील , जामनेर विधानसभा संपर्कप्रमुख श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला .
जामनेरचे प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष मयूर पाटील , उपाध्यक्ष मनोज सनान्से , तालुका संपर्कप्रमुख भूषण कानडजे , तालुका सरचिटणीस सागर बेलेकर , मोरगावच्या सरपंचांचे पती भावसिंग जाधव , उपसरपंच संतोष चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य विश्राम चव्हाण व विनोद चव्हाण , अनिल चव्हाण , हिवरखेड्याच्या सरपंचांचे पती प्रशांत अहिरे , उपसरपंच मंगलसिंग पवार , रिपाइंचे ज्ञानेश्वर जगताप , जनार्दन कुमाका , संतोष पाटील , चिचखेडयाचे उपसरपंच अमित तडवी , आदिवासी संघटनेचे हनीफ तडवी , वाकडीचे माजी सरपंच अकबर तडवी , ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गायकवाड , तळेगावचे ग्रामपंचायत सदस्य दीपक पाडॊळसे , पिंपळगाव गोलाईतचे ग्रामपंचायत सदस्य हरिसिंग सिसोदिया , भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी संघटनेचे प्रा ईश्वर चोरडिया , धनगर समाज महासंघाचे कैलास दांडगे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला .