जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यातील पहूर येथील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. या ‘इनकमिंग’मुळे जामनेर तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.

शुक्रवारी जळगाव येथील जिल्हा काँग्रेस भवनमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना काँग्रेसचा तिरंगा दुपट्टा देऊन पक्षात स्वागत करण्यात आले. पक्षात प्रवेश केलेले प्रमुख पदाधिकारीमध्ये सुकलाल बारी (पहूर), गणेश पांढरे, डॉ. भरत बारी, मोहसीन मजीनशहा, मुक्तार शहा, मोहसीन अहमद मुक्तार अहमद यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेशावेळी जिल्हा सरचिटणीस जमील शेख यांनी माहिती दिली की, जामनेर तालुक्यात काँग्रेस पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट होत आहेत. लवकरच पहूर येथे एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, त्यामध्ये तालुक्यातील असंख्य नागरिक आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जमील शेख, ज्ञानेश्वर कोळी, जामनेर तालुकाध्यक्ष शरद पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष रवींद्र निकम, जिल्हा उपाध्यक्ष मूलचंद नाईक, जिल्हा RGPRS संघटक प्रवीण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









