जामनेर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त जनआशिर्वाद अभियानाला सुरुवात झाली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनआशिर्वाद अभियान या उपक्रमाचे प्रकाशन करण्यात आले.
जामनेर तालुका राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विश्वजित पाटील यांच्या संकल्पनेतून तालुकाध्यक्ष विलास राजपूत यांच्या नेतृत्वात हे अभियान जामनेर तालुक्यातील गावगावत राबविण्यात येणार आहे. अभियानाचा पहिला टप्पा पाळधी-लोंढरी गटात असून दि.१२ जून रोजी भराडी गावापासून सुरुवात होणार आहे. जनआशिर्वाद अभियान तालुकाभरातील मरगळ झटकून राष्ट्रवादी पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात नवचैतन्य प्राप्त करुन देणारे असणार आहे.
प्रकाशन प्रसंगी जामनेर तालुका राष्ट्रवादी पक्षाचे नेते संजय गरुड, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, रोहिणी खडसे, तालुकाध्यक्ष विलास राजपूत, डॉ.मनोहर पाटील, प्रदीप लोढा, तालुका उपाध्यक्ष रोहन राठोड, जि.प.गट संघटक कैलास दांडगे, प्रविण गायकवाड, पं.स.गण संघटक संतोष पाटील, निलेश भगत आदी उपस्थित होते.