सोनाळा परिसरातील शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात पिंपळगाव गोलाई येथे झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मेंढ्यांच्या कळपाला बसला असून यात तब्बल ५५० मेंढ्या दगावल्या आहेत. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे जामनेर तालुक्यासह जिल्ह्यात हाहाकार झाला आहे.
जामनेर तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस व गारपिटीचा प्रचंड फटका बसला आहे. यात रब्बी पिकांसह अनेक गावांत घरांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर मध्यरात्री जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाई येथे वादळी पावसामुळे तब्बल ५५० मेंढ्या दगावल्या आहेत. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे
.मेंढपाळ भगवान धनगर यांच्या मेंढ्या होत्या आणि देवराम पाटील, सोनाळा यांच्या शेतात रोहिणी ढाबाच्या मागे मेंढ्यांचा मुक्काम होता. घटनेची पाहणी आणि पंचनामा जामनेरचे तहसीलदारांनी केला आहे. घटनेची प्रशासन माहिती घेत आहे.