जामनेर ( प्रतिनिधी ) – नवरात्र उत्सवासाठी जामनेर शहरांमध्ये विविध मंडळ नवदुर्गा मातेचे मूर्ती घेऊन जामनेर मध्ये येत आहेत . विशेष म्हणजे ओम साई फाउंडेशन व शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने दुर्गा मातेची विशाल प्रतिमा जामनेर शहरांमध्ये शोभनीय ठरली आहे . दुर्गा मातेचे विराट रूप मोहक अशी मूर्ती जामनेरकरांसाठी मोहक ठरली आहे . मातेची मूर्ती जामनेरमध्ये आली असता अनेक भक्तांनी मूर्तीचे फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केली होती . ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास पालवे , उपाध्यक्ष प्रवीण कुंभार व शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र झाल्टे , उपाध्यक्ष गणेश कापडे यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.