पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे आवाहन
जामनेर (प्रतिनिधी) :- आगामी काळातील सण उत्सव कायद्याचे पालन करून शांततेत साजरे करा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्या, असे आवाहन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. गुरुवारी सकाळी जामनेर पोलीस स्टेशन मध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा जोतिबा फुले जयंती, श्रीराम नवमी निमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पोलीस निरीक्षक किरण शिंदे, सहाय्यक मुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, डॉ. प्रशांत भोंडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी महावितरणबाबत अनेक तक्रारी मांडण्यात आल्या, या बैठकीला जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर, कचरूलाल बोहरा, ताराचंद झंवर, अतिश झाल्टे, राजू खरे, सुहास पाटील, दत्तात्रय सोनवणे, भगवान सोनवणे,, अनिस शेख, रिजवान शेख, नुरू शेख, शराफत अली, शरीफ मंन्सूरी, खलील खान, मुसा पिंजारी, कैलास नरवाडे, जावेद मुल्लाजी, जुबेर अली, जमील पठाण, आलिया खान उपस्थित होते.