उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह वंशजांची उपस्थिती
जामनेर (प्रतिनिधी) : येथील राजमाता जिजाऊ चौकात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्यदिव्य पुतळ्याचे अनावरण उद्घाटन सोहळयांचे आयोजन उद्या दि.११ऑक्टोंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात येत आहे.
कार्यक्रमाठिकाणी पोवाडा, भीमगिते, ढोलताश्याच्या गजरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पंजाब येथील थरार पथक, विविध वाजंत्री असे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. या उद्घाटन सोहळयांचे नियोजन ग्रामविकास,पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या वतीने करण्यात आले आहे. याठिकाणी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्व शिवभक्त व भीमभक्त यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, अशी विंनती भारतीय जनता पार्टी, जामनेरच्या वतीने केली जात आहे.