उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
जामनेर शहरात छत्रपती शिवराय व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
जामनेर (प्रतिनिधी) : गिरीश महाजन हे विधानसभेसाठी फक्त उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी जामनेरात येतील. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही जामनेरकरांची असेल. त्यांना कोणीही येथे पराजीत करू शकत नाही. त्यांची कामे करायची सचोटी असल्याने महाजन यांना संकटमोचक म्हणून संबोधित केले जाते. त्यांना सर्वात जास्त मताधिक्याने विजयी करण्याची जबाबदारी जामनेरकरांची असेल,असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शहरातील राजमाता जिजाऊ चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आसनाधीस्थ पुतळ्यासह शिवसृष्ठीचे व भुसावळ चौकात देशाच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे व भिमसृष्टीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती खा.उदयन राजे भोसले, छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
खऱ्या अर्थाने जामनेर तालुक्याचे शिल्पकार गिरीश महाजन यांनी गेल्या ३० वर्षात शहराचाच नव्हे तर जामनेर तालुक्याचा केलेला विकास हा वाखणण्याजोगा आहे. त्यांनी एकदा ठरवले की, आपल्याला हे काम करायचे आहे. ते काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण झाल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. गिरीश महाजन हे साधेसुधे नसुन अस्सल हिर्यांसारखे आहेत. जामनेरकर हे पारखी आहेत त्यांची पारख जामनेरकरांना आहे. त्यासाठी वाट्टेल ते परिश्रम घेण्याची व कामास तडीस नेण्याची क्षमता त्यांच्यात असल्यामुळे जामनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास होतांना दृष्ठीक्षेपास पडताना दिसून येत आहे. असे गौरव उदगार उपमुख्यमंत्री तदेवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.
लोकार्पण सोहळ्याला देवेंद्र फडणवीस, खा. उदयन राजे भोसले, आ. छत्रपती शिवेंद्र राजे भोसले, खा. रक्षा खडसे, खा. स्मिता वाघ, गिरीश महाजन, साधना महाजन, आ. राजूमामा भोळे, आ.संजय सावकारे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, रवींद्र झाल्टे, नाना बाविस्कर, तुकाराम निकम तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.