जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील फत्तेपूर बसस्थानकावरून बसमध्ये चढणाऱ्या तोरनाळा येथील ७७ वर्षीय विधवा महिलेची १० ग्रॉम सोन्याची पोत दि.५ डिसेंबर रोजी महिला बसमध्ये चढतांना चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ताजी असतानाच दि.६ डिसेंबर रोजी पुन्हा एका शिक्षिका महिला बस मध्ये चढतांना तिची ४ ग्रॉम सोन्याची पोत चोरटे पसार झालेले आहे.

पिंपळगांव चौखांबे येथील मीना प्रदीप अहीर (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. त्या महिला येथील सहकार विद्या मंदीर शाळेत शिक्षिका आहे. त्या फत्तेपूर येथे मीना अहीर ह्या पिंपळगांव येथे जाणेसाठी फत्तेपूर बसस्थानकांवर आल्या. दुपारी ३-२० वाजता बुलढाणा-जामनेर बसमध्ये चढतांना त्यांच्या गळ्यातील ४ ग्रॉम सोन्याची पोत २५ हजार रूपये किमतीची अज्ञात चोरट्यांनी कापून चोरी करून लंपास केल्याची दुसरी घटना घडलेलीआहे.
याबाबत फिर्यादी शिक्षिका मीना अहीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतचा पुढील तपास सहा.पो.नि. अंकुश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा करीत आहेत.









