जामनेर (प्रतिनिधी ) ;- ५ जुलै रोजी ओबीसी आरक्षणच्या मुद्द्यावर भाजपा आमदारांनी विधानसभेत जो आवाज उचलला . विरोध केला त्या मुळे महविकास आघाडी सरकारने १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केले त्याचा निषेध म्हणून आज जामनेर येथे बाबाजी राघो मंगल कार्यालय पासून मोर्चास सुरवात करण्यात आली . नगरपालिका चैकात ठिय्या आंदोलन करून महाविकस आघाडी सरकारची अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. तलिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी भाजपा तालुकध्यक्ष चंद्रकात बाविस्कर , गोविंद अग्रवाल ,न.पा.गटनेते डॉ.प्रशांत भोंडे ,सर्व नगरसेवकजिल्हा परिषद सदस्य भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने आ. गिरिश महाजन यांचे समर्थन करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.