जामनेर ;- गँस, डिझेल, पेट्रोल, इंधन दरवाढीबाबत जामनेर राष्ट्रवादीकडुन नगर परिषद समोर जिजाऊ चौकात आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, संजय गरूड, विलास राजपुत, सरोजिनी गरूड, राजेंद्र चौधरी, किशोर पाटील, अशोक चौधरी, डॉ.प्रशांत पाटील, प्रल्हाद बोरसे, संदिप हिवाळे, दिपक रिछवाल, उज्ज्वला पाटील, सुनंदा चव्हाण, माधव चव्हाण आदी या आंदोलनात सहभागी होते. यावेळी तहसील कार्यालयालर निषेध मोर्चा काढण्यात येवून निवेदन देण्यात आले.