जामनेर प्रतिनिधी:- तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा ग्रामसेवक व प्रभारी ग्रामविकास अधिकारी द्वारे अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यासाठी संपूर्णपणे पंचायत समिती व प्रशासकीय बदली होऊन सुद्धा न जाणारे अधिकारी वर्ग हे जबाबदार आहेत. असा आरोप राष्ट्रवादी पक्षाकडून होत आहे.पंचायत समितीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी पक्षाने जामनेर पंचायत समिती कार्यालय समोर बेमुदत उपोषण मांडले आहे.अशा चालत असलेल्या अनागोंदी कारभारची उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाने केली आहे.
जामनेर तालुक्यातील बेकायदेशीर सिंचन विहिरीची निवड रद्द करून शासन नियमाप्रमाणे आलेल्या ग्रामसभेतील आलेल्या प्राधान्य क्रमाने पात्र लाभार्थ्यांची त्वरित निवड करणे बाबत, जामनेर पं. स.मध्ये वर्षानुवर्षे ठान मांडून बसलेले अधिकारी व कर्मचारी यांची बदली होणे बाबत,जामनेर पं.स. चे विस्तार अधिकारी अशोक पालवे प्रशासक पदी असताना , प्रशासक व ग्रामसेवक यांनी फत्तेपूर ग्रुप ग्रा. पं. गोद्री व जळांद्री ग्रा. पं. चा १५ वित्त आयोगाचे निधी काढून उपाहार केल्या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी होणे बाबत,
भ्रष्टाचारी ग्रामसेवकांची चौकशी करून कायदेशीर कारवाई होणे बाबत, फत्तेपूर ग्रा. पं. ला व्हि.डि.ओ. ची पोस्ट असताना प्रभारी ग्रामसेवकांची बदली होणे बाबत, अशाप्रकारच्या प्रमुख मागण्या असून राष्ट्रवादी पक्षाने पंचायत समिती जामनेर येथे उपोषण मांडले आहे.यावेळी राजेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष रा. कॉ.पा., विलास राजपूत, जि.उपाध्यक्ष जळगांव, किशोर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जामनेर तालुका,डॉ.प्रशांत पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष जळगांव, संदीप हिवाळे, तालुकाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग,जामनेर, जितेश पाटील,शहराध्यक्ष, रा. कॉ.पा. जामनेर,राजू नाईक, सागर कुमावत , दिपक रिछ् वाल,भूषण पाटील इ. पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.