आ. एकनाथराव खडसे,संजयजी सावंत , प्रा. कविता म्हैत्रे यांची उपस्थिती
जामनेर (प्रतिनिधी ) ;-जामनेर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे आणि शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारार्थ उद्या ९ रोजी पहूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडे बाजार,येथे सायं. ७ वाजता भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथराव खडसे , पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तथा स्टार प्रचारक प्रा. कविता म्हेत्रे
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते तथा संपर्कप्रमुख जळगाव जिल्हा संजय सावंत उद्योजक श्रीराम पाटील , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक सिंग राजपूतपा,पारस ललवाणी,तकार गटाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे, विश्वजीत मनोहर पाटील आदी नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.