जामनेर येथे शास्त्री नगरात उपक्रम
जामनेर (प्रतिनिधी) : येथे श्री संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगर येथील गजानन महाराज मंदिर येथे गजानन महाराज परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यात पुरुष व महिला यांचा सहभाग होता. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास गजानन महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. ५० हजार रुपयांचा अपघाती विमा यावेळी रक्तदात्याला देण्यात आला. तसेच भविष्यात रक्तदात्याला गरज पडली तर मोफत रक्त व नातेवाईक असल्यास ५० टक्के रकमेतून व कार्डवर घेतल्यास ३०० रुपये मध्ये रक्त देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.
रक्तदानाला सकाळी ९ वाजता सुरवात करण्यात आली होती. सकाळीच रक्तदात्यानी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. रक्तदान शिबिराचे यंदा तिसरे वर्ष होते, अशी माहिती गजानन महाराज मंदिराचे सेवेकरी ईश्वर चवरे यांनी दिली. रक्तदानाला सहकार्य सर्व मित्र मंडळ व भक्त परिवार यांनी केले.