जामनेर (प्रतिनिधी ) – येथील विद्याभारती देवगिरी प्रांत संलग्नित, लिटिल नेस्ट माय छोटा स्कूल मधील विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या पद्धतीची प्रशिक्षण कार्यशाळा घेत आहे. ७५ वा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले.त्याचपद्धतीने आता गणेशोत्सवाच्या धाम-धुमीत विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होतं आहे. लिटिल नेस्ट माय छोटा स्कूल मधील विद्यार्थ्यांना कागदी पेपर ग्लास व कागदी वर्क शीट पासून लॉर्ड गणपती बाप्पाचं मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्य सौ.केतकी राहुल चव्हाण यांनी शिक्षकेत्तर- कर्मचारी यांचे अभिनंदन केले.