अभाविप वतीने कार्यकर्त्यांना भारतमाता प्रतिमांचे वाटप
जामनेर (वृत्तसंस्था ) ;– 14 ऑगस्ट अखंड भारत दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामनेर ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल जामनेर ओम साई ग्रामीण विकास प्रतिष्ठान जामनेर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल येथे करण्यात आले होते यावेळी 43 रक्तदात्यांनी रक्तदान केले अखंड भारत दिनाचे निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय संत समिती कोषाध्यक्ष तथा महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज , जामनेर नगराध्यक्ष साधनाताई महाजन , जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कोरोणा प्रतिबंधक सर्व नियम पाळून उपक्रम पार पाडण्यात आला.