मंत्री ना. गिरीश महाजन यांची माहिती
जामनेर(प्रतिनिधी): जामनेर शहरात रस्त्याच्या दुभाजकात बारा ते पंधरा फुटाची नारळाची वृक्ष व मधोमध फुल झाडे लावण्यात आली आहे. आज सकाळी त्यातील काही वृक्ष तोडून व काही वृक्ष चोरून घेऊन जात असल्याचे सुज्ञ नागरिक यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती ना. गिरीष महाजन यांना दिली. गिरीष महाजन यांनी सांगितले की, शहरात सुशोभीकरण करण्यात आलेल्या दुभाजक मधिल झाडे कोणी तोडत असेल किंवा चोरून नेत असेल त्यांची कुठलीही गय केली जाणार नाही.
सदर ठिकाणीं सीसीटिव्ही लावण्याचे आदेश दिले असून अशा प्रकारचे नुकसान कोणी माथेफिरू करत असेल तर त्याचे नांव निदर्शनात आणून द्या. माहिती देणाऱ्यांचे गुपित ठेवण्यात येईल व अशा माथेफिरूचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला जाईल. शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याने कारवाई केली जाईल. असे आदेश संबंधित अधिकारी यांना ना. गिरीष महाजन यांनी दिले.