जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा व मृद जलसंधारण विभागातील जिल्हा परिषद यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या जळगाव जिल्ह्यातील पदस्थापनेने बदल्या राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाने जाहीर केल्या आहेत. एकूण सहा अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.

जिल्हा जलसंधारण अधिकारी रमेश माधवराव कांबळे यांची जि. प. च्या लघु पाटबंधारे विभागातून चोपडा येथे उपविभागीय जलसंधारण अधिकारी म्हणून बदली झाली आहे. दीपक विजय महाजन यांची चोपडा येथून नाशिक येथे, विनय पद्माकर कुलकर्णी यांची रावेर येथून मुक्ताईनगर, रामेश्वर नामदेव जाधव यांची रावेर येथून अकोला येथे बदली झाली आहे. तसेच, प्रशांत किशोर आराक यांची रावेर येथून जामनेर, सुरेश बारकू गायकवाड यांची चाळीसगाव येथून पारोळा येथे तर अजित श्रीधर पवार यांची चोपडा येथून रावेर येथे बदली झाली आहे.
राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाचे कक्ष अधिकारी श. ह. खारोडे यांची बदली पदस्थापना आदेश पत्रावर स्वाक्षरी आहे.








