जालना ( प्रतिनिधी ) – काल मुंबईतील सह्याद्री विश्रामगृह येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाची बैठक पार पडली

बऱ्याच दिवसापासून प्रलंबीत असलेले ३, ४ व ५ लाखांची मागणी असलेले एन एफ डी सी बँक कर्ज प्रस्ताव महिनाभरात निकाली काढण्याचे आश्वासन महात्मा फुले महामंडळाचे महासंचालक बिपिन श्रीमाळी यांनी या बैठकीत दिले.
या बैठकीस महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे महासंचालक बिपिन श्रीमाळी , रिपाइंचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पु कागदे, मुख्य व्यवस्थापक प्रशांत गेडाम आणि.सुमित वजाळे उपस्थीत होते. या बैठकीमुळे राज्यातील लाभधारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.







