जळके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवृत्ती अर्जुन पाटील यांची बिनविरोध निवड

गावाच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकमत; ग्रामस्थांत समाधान
जळके (प्रतिनिधी ) : जळके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्टॅम्प वेंडर निवृत्ती अर्जुन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत कोणताही विरोध न झाल्याने निवृत्ती पाटील यांची उपसरपंचपदी निवड अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली.
या वेळी लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत गणपत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य वत्सलाबाई कडुबा पाटील, सुशिलाबाई रमेश पाटील, रुखमाबाई बाबुलाल पाटील, शिल्पाबाई दादा ब्राम्हणे, दिगंबर प्रल्हाद पाटील उपस्थित होते. तसेच ग्रामसेवक सुनील पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन केले.
बिनविरोध निवडीमुळे ग्रामपंचायतीत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, येणाऱ्या काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच व उपसरपंच मिळून समन्वयाने काम करतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.









