भडगाव ( प्रतिनिधी ) – येथून जवळच असलेल्या भोरटेक ( ता पाचोरा ) येथील गोपीचंद महादू चांभार यांच्या घरात दिवा जळताना आग लागल्यामुळे त्यांचा पूर्ण संसार कपडे व धान्य व इतर सर्वच संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
गोपीचंद चांभार यांना आजच राहण्यासाठी घर नाही त्यांना मदतीची गरज आहे हे पाहून जि प सदस्य मनोहर पाटील यांनी पाहणी केली व तात्काळ मदत म्हणून पाच हजार रुपये दिले यावेळी सरपंच गुलाब चांभार , उपसरपंच श्रावण पाटील , राष्ट्रवादी किसन सेलचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील, ग्रामसेवक समाधान पवार, भारत पाटील, गोकुळ पाटील , प्रकाश पाटील , विनोद पाटील, रावसाहेब पाटील , शुभम पाटिल, दिनेश पाटिल , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.